Breaking News

केज येथील भगवान बाबा चौकाचे बांधकाम करा : भगवान सेनेची मागणी

गौतम बचुटे । केज  

केज येथील भगवान बाबा चौकाचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी भगवान सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील बीड-अंबाजोगाई महामार्गाच्या कामामुळे भगवान बाबा चौक पाडण्यात आला असून या चौकाचे नव्याने बांधकाम व सुशोभीकरण करण्याची मागणी भगवान सेनेच्या वतीने आकाश नेहरकर यांनी केली आहे. या बाबत भगवान सेनेच्या वतीने तहसीलदार दुलाजी मेंढके यांना मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर मागणी संदर्भात कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचाही ईशारा दिला आहे.

No comments