Breaking News

खा.डॉ.प्रितमताई मुंडे बीडकरांचे व मुंडेसाहेबांचे स्वप्न साकार करतायत : शंकर देशमुख


आष्टी : बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात ५२७ कोटी ६३ लाख  रुपयांची तरतूद केली आहे.रेल्वे मार्गासाठी हा निधी मंजूर केल्यामुळे बीडकरांचे व स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खा.प्रीतमताई मुंडे स्वप्न साकार करत आहेत भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

नगर,-बीड-परळी रेल्वे मार्गसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी स्वप्न पाहीले व आपल्या कार्यकाळात याला मंजुरी ही मिळविली तेच कार्य आज खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची रेल्वेमार्गाच्या कामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात ५२७ कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.रेल्वे मार्गाच्या कामाला निधीची कमतरता भासू नये व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने पाचशे सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.  या भरीव निधी मुळे बीडकरांचे स्वप्न लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे केंद्र सरकार या मार्गासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात खा.प्रीतमताईच्या पाठपुराव्याचा विचार करुन तरतुद करते पण राज्य सरकार या कामासाठी राज्यसरकारचा वाटा देत नाही ही उदासीनते मुळेच काम रखडले होते.

 लोकनेत्या पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना राज्यसरकारने तेव्हा निधी दिला होता आज केंद्र सरकारने दिलेला निधी आणि खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेला पाठपुरावा रेल्वेच्या कामाला गती मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांचे व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे रेल्वे आणण्यासाठीचे स्वप्न साकार होत असल्याचे शंकर देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे


No comments