Breaking News

केज तालुक्यात माझा गाव आमचा विकास कार्यशाळा

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील चिंचोली माळी व युसुफवडगाव येथे दि.१२ फेब्रुवारी रोजी माझा गाव आमचा विकास या कार्यक्रमा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

बाबतची माहिती अशी की, महाराष्ट्र शासनच्या आमचा गांव आमचा विकास (जीपीडीपी) उपक्रमा अंतर्गत चिंचोली माळी आणि युसुफवडगाव जिल्हा परिषद गटातील साळेगाव व भालगाव या गावाचा आमचा गांव आमचा विकास (जीपीडीपी) योजने अंतर्गत आराखडा तयार करण्यासाठी बचत गट अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, कारकुन, पाणी पुरवठा कर्मचारी व शिपाई यांची कार्यशाळा एक दिवसीय कार्यशाळा ही दि. १२ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार रोजी सकाळी १०:०० वा. आयोजित करण्यात आलेली आहे. 
सााळेगावसाठी चिंचोली माळी तर भालगावसाठी युसुफवडगाव येथे कार्यशाळा होणार आहे. या एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेला सर्वांनी वेळेवर रहावे. गैरसमज राहिल्यास गंभीर दखल घेण्यात येईल. असा इशारा देखील गटविकास अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे दिला आहे. Zzzzzzzzzzzzzz

No comments