Breaking News

बीड शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी आम आदमी पक्ष आक्रमक

पालवण चौक-खोलवाट-पंचशीलनगर रस्त्याच्या कामास गती आणण्यासाठी

आपसह स्थानिक नागरिक नगरपरिषदेवर धडकले 

मुख्याधिकायांच्या अनुपस्थितीत प्रभारींना भेटले शिष्टमंडळ 

बीड - आम आदमी पार्टीच्या वतीने काल सोमवार रोजी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. पालवण चौक -खोल वाट येथील रस्ता पंचशील नगर हा रस्ता रखडलेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरु केलेले नसून या ठिकाणी खड्ड्यात पडून एका युवकाचा मृत्यू देखील झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला व नागरिकांनी नगरपरिषदेकडे आपला मोर्चा वळवला आहे. काल मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत प्रभार असणाऱ्या रवींद्र यारगोळे यांची भेट आपच्या शिष्टमंडळाने घेत, काम कधी सुरु होणार असा सवाल केला आहे. 

   गेल्या ६ महिन्यांपासून स्वराजनगर, शिवाजीनगर, दिलीपनगर, पंचशीलनगर भागातील नागरिक त्रास सहन करत आहेत. रस्ता खोदून ठेवला आहे मात्र तो पूर्ण केला जात नाही. या रस्त्याचे काम जर ८ दिवसांत सुरु झाले नाही तर आम आदमी पार्टी आंदोलन उभे करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी  दिला आहे. यावेळी शिष्टमंडळाने निवेदन देत हा इशारा दिलेला आहे. जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्यासह रामधन जमाले, सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर जी राऊत, संघटन मंत्री रामभाऊजी शेरकर, प्रचारप्रमुख सय्यद सादेक शहर प्रमुख, इत्यादी कार्यकर्त्या सहित या भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शहरात जिथे समस्या तेथे आप !

बीड शहरात ज्या ठिकाणी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जाते, जाणीवपुर्वक त्रास दिला जातो तेथे आम आदमी पक्षाकडे बीडकरांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आप बीड शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देत राहणार असल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे म्हणाले.

No comments