Breaking News

उपजिल्हाधिकारी भूसुधार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकऱ्याचं मुलासह जिल्हाकचेरी समोर उपोषण

बीड :  उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांनी कायद्यात तरतूद नसताना अधिकाराचा दुरुपयोग करून कुळ न्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशात अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या अपिलात एक वर्षापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2019 रोजी दिलेला स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा. अशी मागणी वारंवार करूनही उपजिल्हाधिकारी भूसुधार त्याकडे दुर्लक्ष करुन आपला मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्या मनमानीला कंटाळून पिंपळवाडी येथील शेतकरी आपल्या मुलासह जिल्हा कचेरीसमोर सोमवारी (दि.१५) उपोषणास बसला आहे.

हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950 चे कलम 92 मधील कायद्यात तरतूद नसतानाही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांनी कुळन्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशास अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या अपिलात एक वर्षापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2019 रोजी स्थगिती आदेश दिला.हा आदेश रद्द करण्यात यावा. तसेच कुळ न्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या आदेशानुसार मालकी हक्काची रक्कम भरणा केलेली असल्याने बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील सर्वे नंबर 169 व 170 च्या 7/12 वर मालकी हक्कात नोंद घेण्यात यावी. उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेले अपील गुणवत्तेवर निकाली काढण्यात यावे. अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आपला मनमानी कारभार हाकत आहेत. त्यांच्या मनमानीला कंटाळून पिंपळवाडी येथील शेतकरी दगडू निकाळजे व त्यांचा मुलगा लालासाहेब निकाळजे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

No comments