Breaking News

केज तालुक्यात रब्बी पीक कापणी प्रयोग

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील लव्हूरी येथे रब्बी ज्वारी पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.

कृषी विभागाच्या वतीने दि. २२ फेब्रुवारी मंगळवार रोजी मौजे लव्हुरी ता. केज येथे रब्बी ज्वारी पिक कापनी प्रयोग घेण्यात आला. या पीक कापणी प्रयोगाच्या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी. जी. मुळे, तालुका कृषि अधिकारी जे. बी. भगत, मंडळ कृषि अधिकारी विकास अंभोरे साहेब व तालुका कृषी कार्यालयाचे पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि शेतकरी उपस्थित होते.
No comments