Breaking News

विना मास्क फिरणाऱ्यांवर केजमध्ये पोलीस आणि नगर पंचायत प्रशासनाची कार्यवाही


 गौतम बचुटे । केज 

 शहरात विना मास्क फिरणारे व नियमांचा भंग करणारे वाहनचालक यांच्यावर केज पोलीस आणि नगर पंचायतीच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. 


या बाबतची माहिती अशी की, केज शहरा मध्ये कोरोना व साथ रोगाची संसर्गजन्य आजाराची साथ प्रसरण्याचा धोका असतानाही स्वतःच्या व इतरांच्या जिवीरताची पर्वा न करता विना मास्क फिरून स्वतः आणि त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या पादचारी व वाहनचालकां विरुद्ध कोरोना व साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर केज नगरपंचायतच्या पथकाने प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि बाळासाहेब सोनवणे यांनी ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश एअर हॉर्न, तसेच नियमांचा भंग करून वाहन चालक व दुचाकीस्वार यांच्याविरुद्ध कारवाई करून दंड करण्यात आला.
No comments