Breaking News

युवा पत्रकार अमरजान पठाण यांचा आम आदमी पक्षात प्रवेश


 
आम आदमी पक्ष बीडकरांच्या पसंतीस उतरतोय !
बीड : गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष बीड शहरात नागरिकांच्या समस्यांबाबत चांगले काम करत आहे. विविध यशस्वी आंदोलने, धर्मनिरपेक्ष धोरण, आठवड्याला स्वच्छता अभियान यामुळे बीडकरांच्या मनात आम आदमी पक्षाने स्थान निर्माण केले आहे. काल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, युवक प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, सुग्रीव मुंडे, जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष साजेद यांच्यासह आप पक्षाच्या उपस्थितीत बीड येथे संवाद दौरा संपन्न झाला. 

  या दौऱ्यानिमित्त बीड येथे आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत युवा पत्रकार अमरजान पठाण यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. अमरजान यांनी आम आदमी पक्ष सध्या बीड शहरात नव्या धोरणासह परिवर्तन घडवण्यासाठी काम करत असून या कार्यात सहभागी होऊन घराणेशाही, भ्रष्टाचार मुक्त सिस्टीम उभी करण्यासाठी या पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. यावेळी पठाण यांच्यासह विद्यार्थी व युवकांनी देखील आपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सर्व पक्षप्रवेशीतांचे स्वागत केले.

No comments