Breaking News

आदर्श शिक्षक महालिंगअप्पा फुटके यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव समारंभ

परळी वैजनाथ : तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील निवृत्त आदर्श शिक्षक महालिंगअप्पा फुटके यांच्या पंचाहत्तरी निमित्त ग्रंथतुला व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.०६) मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथतुला व गौरव सोहळा उत्साहात पार पडला. 

             गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयातील सहशिक्षक महालिंगअप्पा फुटके गुरुजी यांच्या पंचाहत्तरी निमित्त मित्रमंडळी व परिवाराच्या वतीने ग्रंथतुला व अमृतमहोत्सवाचे आयोजन रविवारी (ता.०५) वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुटके गुरुजी यांचे परिवारातील सुवासिनी महिलांनी ७५ दिव्यांनी औक्षण केले. त्यानंतर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ग्रंथाची फुटके गुरुजी यांच्या वजना ऐवढी (८० किलो) ग्रंथतुला करण्यात आल्यानंतर गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके यांनी केले. 

यानंतर उपस्थित मान्यवरांनी यात प्रसिध्द कवी अरुण पवार, सोपानराव नानवटे गुरुजी, संतोष नारायणकर, सकाळचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता देशमुख, घाडगे गुरुजी, मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, ओबीचे नेते विलास ताटे, प्राचार्या डॉ. परळीकर, लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रा.डॉ विनोद जगतकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी, शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी, सरपंच  कांतराव सोनवणे, प्रभाकर वाघमोडे, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त बाबासाहेब देशमुख, कुस्तीगीर संघटनेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे, शनैश्वर प्रतिष्ठान चे पदाधिकारी,शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह आदिंनी शुभेच्छा दिल्या.  यावेळी सर्व मान्यवरांना ग्रंथ भैट देण्यात आले.

दरम्यान महालिंगप्पा फुटके गुरुजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव व ग्रंथतुला कार्यक्रमानंतर फुटके गुरुजी यांच्या हस्ते आनंदवन येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री.सुरेश नानवटे,महेश सिरसाट, बाबा मुंडे,चंद्रशेखर फुटके,पत्रकार महादेव गित्ते, श्री.कांदे आदी वृक्षमित्र उपस्थिती होते.

No comments