आष्टी ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी आबासाहेब खिलारे तर उपाध्यक्षपदी नवनाथ लोंढे यांची निवड
कडा : आष्टी तालुका ग्रामसेवक संघटनेची जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी समितीच्या सभागृहात कार्यकारिणी निवडीसाठी खेळीमेळीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली.
आष्टी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी आबासाहेब खिलारे तर उपाध्यक्षपदी नवनाथ लोंढे, संतोष बोडखे,दिपाली गायकवाड,प्रसाद आरु,कोषाध्यक्षपदी शकिल सय्यद,यांची निवड करण्यात आली.बैठकीला मनोहर जाधव, गोवर्धन गिरी,बाळासाहेब जायभाय,भाऊसाहेब मिसाळ, संतोष बोडखे, प्रदिप बनकर, बापूसाहेब जगताप,काकासाहेब आगासे,यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.
No comments