Breaking News

रविवारी आप'ने तुळजाई चौक, पंचशीलनगर भागात स्वच्छता अभियान राबविले


पालवन चौक रोडच्या कामाला गती येण्यासाठी आम आदमी पार्टी स्थानिक नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांना भेटणार - जिल्हाध्यक्ष अशोक येडे

बीड : आम आदमी पार्टीच्या वतीने बीड शहरामध्ये प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे. या मोहिमेद्वारे आप बीड नगरपरिषदेच्या नाकर्तेपणाला सर्वांच्या समोर आणत आहे.  बीड शहरातील तुळजाई चौक स्वच्छतेसह मित्र नगर चौक, पालवन रोड खोल वाट, पंचशिल नगर या यामधील नागरिकांना भेटी देऊन त्यांच्या समस्या विचारण्यात आल्या. 

 

   नागरिकांनी आपल्या नगरपालिकेच्या विरोधी रोष व्यक्त केला आणि खोल वाट कॉलेज चौक ते पालवण चौक असणारा खोल वाट नावाचा रस्ता हा जवळपास सहा महिन्यापासून खादुन ठेवलेला आहे. त्यामध्ये एका धांडे नावाच्या मुलाचा पडून मृत्यू देखील झाला. पण याकडे नगरपरिषदेने काहीही लक्ष दिले नाही. तेथे घाणीचे साम्राज्य, मोकाट जनावरे, पिसाळलेले कुत्रे, डुकरे वावरत आहेत. नगरपरिषद एवढी नागरीका विषय उदासीन का आहे? अशी विचारणा करत आहेत. समस्त नागरिकांना वेठीस धरण्याचे काम नगरपालिका का करत आहे? अशी विचारणार करण्यासाठी आम्ही आम आदमी पार्टी बीड मुख्याधिकाऱ्यांना समस्त नागरिकांना सोबत घेऊन हा पालवण रस्ता किती दिवसात ठीक करणार? असे विचारणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी म्हंटले आहे. सलग 6 व्या रविवारी आपने शहरात स्वच्छता अभियान राबविले आहे. यावेळी शहर प्रमुख सय्यद सादिक, जिल्हा सचिव रामधन जी जमाले, मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर, शहर सचिव मिलिंद पाळणे, स्वप्निल गायकवाड इत्यादींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.


No comments