Breaking News

हंबर्डे महाविद्यालयात फार्मर प्रोड्यूसर कंपनी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

आष्टी :  आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल मेहेर यांच्या प्रेरणेने सोमवार (दि.8) अड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात तालुक्यातील  समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गावांसाठी तसेच जलमित्र तसेच शेतकाऱ्यांसाठी  फार्मर प्रोड्यूसर कंपनी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

 यामध्ये समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी झालेल्या सर्व गावांसाठी तसेच  जलमित्राना , शेतकाऱ्यांना प्रोड्यूसर कंपनी स्थापन  करण्यासाठी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली , या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे तर प्रमुख  मार्गदर्शक म्हणून राजेद्रजी सुपेकर  (ता.कृषी अधिकारी आष्टी), संतोष शिनगारे (मराठवाडा समन्वयक पाणी फाॅऊडेशन ), मंगेश मंगरुळकर (C. S. फार्मर प्रोड्यूसर कंपनी) यावेळी सुपेकर यांनी उपस्थितांना  कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या तसेच त्यांनी करावयाची कार्य तसेच सभासदांच्या मासिक बैठका तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा ,वार्षिक अंकेक्षण करणे आवश्यक असते अशी माहिती दिली तसेच सर्व कायदेशीर बाबींचे पालन करणे आवश्यक आहे असेही सांगितले यानंतर प्राचार्य डॉ.निंबोरे यांनी बोलताना सांगितले शेतकऱ्यांनी जर आपले उद्दिष्ट स्पष्ट ठेऊन जर कंपनीचे कार्य केले तर निश्चित ध्येय गाठण्यासाठी मदत होईल व ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध होऊन महाराष्ट व भारत देशाच्या आर्थिक विकास होण्यास मदत होईल असे सांगून शासनानेही योजना सुरू केल्याबद्दल धन्यवाद दिले.  यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी ,जलमित्र तसेच ग्रामस्त उपस्थित होते. 

No comments