Breaking News

राजमुद्रा संघटनेच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन


बीड :  राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रमुख महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज, सोमवारी विविध सामाजिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती राजमुद्रा संघटनेचे अध्यक्ष तथा नगर सेवक किशोर पिंगळे यांनी दिली. 
बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारी राजमुद्रा संघटनेची ओळख आहे. संघटनेच्या अध्यक्षासह इतर पदाधिकार्‍यांचा वाढदिवसही सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अन्न-धान्य वाटप, वृक्ष लागवड आदी कार्यक्रम घेतले जातात. 
राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रमुख महेश शिंदे यांचा आज, 1 मार्च रोजी बीड शहरात वृक्ष लागवड, गरिबांना वह्या-पुस्तके वाटप, व अनाथ मुलांना अन्न-धान्याचे वाटप व महा रक्तदान शिबीर घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष तथा नगर सेवक किशोर पिंगळे यांनी सांगितले.

No comments