Breaking News

आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्ते निर्माण होतात - बाबुराव पोटभरे

परळी  : फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्तेनिर्माण होतात असे प्रतिपादन बहुजन विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष  बाबुराव पोटभरे यांनी परळी येथील भीमनगर येथे दि.८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी, रमाई प्रतिष्ठान आयोजित त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सोव कार्यक्रमा प्रसंगी केले.

 यावेळी विचारमंचावर म.गां.रो.ह.यो.सदस्य तथा पं.स.सदस्य श्रीहरी मोरे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, पं.स.सदस्य मुरलीधर साळवे, अनंत इंगळे, फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, नगरसेवक केशव गायकवाड, किशोर चोपडे, स्वप्नील साळवे आदी उपस्थित होते. या भीमगीताच्या जलसा कार्यक्रमात शुभम मस्के म्हणाले की, आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार - प्रसार भीमगीतांच्या माध्यमातून करणार. बाबुराव पोटभरे पुढे म्हणाले की, वर्तमान केंद्र सरकार संविधान व शेतकरी विरोधी असून भांडवलदार अडाणी - अंबानींना खुली सूट देत आहे. या केंद्र सरकारला अद्दल घडविण्याचे काम केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळच करू शकते असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. हा कार्यक्रम कोविड-१९ चे सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई प्रतिष्ठानचे सुयोग अवचार, प्रशांत चक्रे, तुषार डोंगरे, नितीन जगतकर, अनंत जगतकर, निशात बनसोडे, रोहन उपाध्याय, सागर हनवते आदींनी परिश्रम घेतले.





No comments