Breaking News

"संविधान के रास्ते" प्रशिक्षण शिबिरातून मनुवादी विचारसरणी विरुद्ध लढा देण्याची ऊर्जा मिळाली --दत्ता कांबळे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु .जाती विभागाचा स्तुत्य उपक्रम

माजलगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ अंभोरे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील विभागाच्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटना वाढीसाठी एक वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून कोविड१९ च्या भयानक संकटाची तीव्रता कमी होताच राज्यातील "संविधान के रास्ते" हे पहिले शिबिर १८ फेब्रुवारी रोजी ग्रेट नालंदा हॉल,डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज परिसर, चेंबूर(पश्चिम)मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.

काँग्रेस अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ अंभोरे हे स्वतः कोविड १९ पॉझीटीव असतानाही आपल्या अनुपस्थितीत शिबिर यशस्वी घडवून आणण्याचे सामर्थ्य दाखवले .संविधान के रास्ते या शिबिरात राज्यभरातील काँग्रेस अनु जाती विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष , कार्याध्यक्ष,प्रदेश पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रशिक्षण शिबिरातून मनुवादी विचारसरणी विरुद्ध कश्या पद्धतीने दोन हात करावे,देशात पुरोगामी विचारांचा प्रसार कसा करावा,देशाला आंबेडकरवादी विचारसणीची गरज आहे हे इतरांना कशापद्दतीने मांडणी करावी ,देशासाठी काँग्रेसचे योगदान काय अश्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


शिबिराच्या दरम्यान ,अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव संपत,श्रीमती सोनल पटेल ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान मंडळ अनु .जाती कल्याण समितीच्या प्रथम महिला अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष जेष्ठ नेते भाई नगराळे ,सचिन राव ,निरंजन टकले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु .जाती विभागाचे प्रभारी मनोज बागरी,महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा प्रमिला ऊके ,विभागाचे कार्याध्यक्ष डॉ जितेंद्र देहाडे , कार्याध्यक्ष गौतम अरखडे,विभागाचे उपाध्यक्ष व सोशिअल मीडिया समन्वयक प्रशांत पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   " संविधान के रास्ते " या प्रशिक्षण शिबिरातून मनुवादी विचारसरणी विरुद्ध लढा देण्याची बळ राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाले असून देशातील भाजपाच्या मनुवादी विचारसरणीला पराभूत करण्यासाठी विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ अंभोरे यांच्या नेतृत्वात आता राज्यभरातील कार्यकर्ते सज्ज असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अनु. जाती विभागाचे नेते दत्ता कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले आहे . यावेळी ग्रेट नालंदा हॉल,डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज परिसर, चेंबूर(पश्चिम)मुंबईयेथील या प्रशिक्षण शिबिरास  जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
No comments