Breaking News

तरुणांनी राजकारणासोबत व्यवसायाकडे वळणे काळाची गरज- रामहरी मेटे

कडा : सध्या मोठ्या प्रमाणावर तरूण राजकारणाकडे येत आहे. राजकारण करताना सामाजिक भान ठेऊन आता व्यवसायाकडे देखील तेवढ्याच जिद्दीने वळावे असे प्रतिपादन शिवसंग्रामचे युवक जिल्हा अध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांनी केले.

 आष्टी तालुक्यातील तागडखेल येथे शिवसंग्राम शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलतांना मेटे म्हणाले, दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे बहजुन समाजाला सोबत घेऊन संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे राजकारणा सोबत बहुजनाचे काम करत आहेत. त्यामुळे आजच्या धावपळीच्या कामात तरूणानी राजकारणासोबत उद्योगात देखील तेवढ्याच हुन्नरीने सहभाग घ्यावा, मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी मेटे साहेब जिवाचे रान करतील पण तो आरक्षण प्रश्न तडीस नेतील असे त्यांनी सांगितले. तर शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की आष्टी तालुक्यात गाव,वाडी, वस्ती वर शाखा उघडून त्याठिकाणी शिवसंग्रामचे मावळ्यांची  ताकद निर्माण करून गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा एखाद्या वर अन्याय अत्याचार होत असेल किंवा कोणत्याही सामाजिक कार्यासाठी काही अडचणी येत असतील तर मला कधी फोन करा मी तुमचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. 

   यावेळी उद्घाटक रामहरी भैय्या मेटे जिल्हा अध्यक्ष युवक, प्रमुख पाहुणे, अनिल घुमरे पाटील , नितीन आगवान, सुनिल शिंदे, तान्हाजी पवळे, ज्ञानेश्वर चौधरी, धनजंय फिस्के, राजु म्हस्के, सागर पांडुळे, तुषार जाधव, विशाल सासवडे, महेश खांदवे, कोडीराम नवले, किशोर जाधव, शिवाजी तात्या म्हस्के, मधुकर शिरसाठ, बाळासाहेब गव्हाणे, सचिन गव्हाणे, अरूण जपकर, अमोल गव्हाणे, तात्यासाहेब नालकोल बाळु मांढरे, बाबासाहेब आंधळे, आदी उपस्थित होते.

No comments