Breaking News

पत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड :  पत्रकार उत्तम  ओव्हाळ यांचा वाढदिवस प्रकाश आंबेडकर नगरमध्ये गुरुवारी (दि.२५) विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी विविध सामाजिक- राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येथील  पत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक- राजकीय कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर नगरमध्ये गुरुवारी आयोजित केला होता. यावेळी ओव्हाळ यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून  परिसरातील नागरिकांना पेढे वाटून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सनी वाघमारे गायकवाड गोरख काळे आकाश वीर राजवीर कामेश धनगर बालाजी कुसळकर संतोष कुराडे अमर शिनगारे नवनाथ विटकर बबलू ओव्हाळ व समस्त नागरिकांची उपस्थिती होती. 

No comments