Breaking News

पांगरी रोड, अंबिका चौकात आम आदमी पक्षाचे स्वच्छता अभियान

सुजाण बीडकरांचा अभियानात सहभाग 

स्वच्छतेच्या खर्चाबाबत आम आदमी पक्ष नगरपरिषदेला जाब विचारणार - अशोक येडे

बीड : आम आदमी पक्ष गेल्या ९ आठवड्यांपासून बीड शहरात स्वच्छता अभियान राबवत आहे. या स्वच्छता अभियानातून आपने नगरपरिषदेच्या हलगर्जीपणाचा बुरखा फाडला आहे. रविवार रोजी पांगरी रोड, अंबिका चौकात आम आदमी पक्षाकडून स्वच्छता अभियान राबविले. यावेळी आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी नगरपरिषदेला आम आदमी पक्ष स्वच्छतेचा जाब विचारणार असल्याचे अशोक येडे यांनी सांगितले. 


   प्रत्येक रविवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता अभियान राबविले जाते. या अभियानात आम आदमी पक्ष बीडकरांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवत आहे. एक सुजाण बीडकर म्हणून  ऍड शशिकांत सावंत, मुकुंद गोरे, युवा उद्योजक संघाचे दत्ता जाधव, भाई दत्ता प्रभाळे यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.


 

अंबिका चौक येथे केलेल्या स्वच्छता अभियानात जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सचिव रामधन जमाले, संघटक प्रा ज्ञानेश्वर राऊत, राम शेरकर, संदीप घाडगे, आमटे, योगेश पवळ, अभिषेक टाळके आदी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments