Breaking News

वर्तमान फाउंडेशन सन्मान सोहळ्यात पत्रकार प्रकाश काशिद व संजय सपाटेंचा विशेष गौरव


दिंद्रुड  : माजलगाव येथील व्यंकटेश कॉन्फरन्स हॉलमध्ये नुकताच वर्तमान फाउंडेशन आयोजित सन्मान सोहळ्यात दिंद्रुड चे ज्येष्ट पत्रकार प्रकाश काशीद व सहकाररत्न संजय सपाटे यांचा विशेष गौरव करण्यात आला.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अशोक आबा डक व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती. 

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार काशिद यांचा तर पतसंस्था फेडरेशन च्या माध्यमातून माजलगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांना दिशा देत नोकरी देत सहकार क्षेत्रात ठसा उमटवल्या बाबत पतसंस्था फेडरेशनचे सचिव संजय सपाटे यांचा शिवसेना मुंबई वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकआबा डक, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कल्याणराव आबुज, शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव,माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी शेजुळ, जि.प. सदस्य चंद्रकांत शेजुळ यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रा.रमेश गटकळ सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वर्तमानचे संपादक भगीरथ तोडकरी यांनी आभार मानले. या सोहळ्यात पत्रकार भूषण म्हणून सुभाष नाकलगावकर व पत्रकारितेतील विशेष कार्याबद्दल बाबा श्रीहरी देशमाने यांना सन्मानित करण्यात आले. पतसंस्था फेडरेशन चे उपाध्यक्ष अनंत शेंडगे,पत्रकार हरीश यादव यांचाही सत्कार करण्यात आला. सदर सत्कार सोहळ्यास दिंद्रुड चे माजी सरपंच दिलीपराव कोमटवार, ग्रामपंचायत सदस्य नारायणराव चांदबोधले ,मधुकर देशमाने, भारत गौंडर, पत्रकार संतोष स्वामी,नागेश  वक्रे, बालासाहेब फपाळ,संजय शिंदे, एकनाथ हंगरगे यांची उपस्थिती होती.

No comments