Breaking News

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत : संबंधित अधिकारी पैशांची मागणी करत असल्यास तक्रार करा - शिवाजी काळे

दिंद्रुड :   माजलगाव मतदारसंघाचे आ.प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आठवड्यात धारूर तालुका संजय गांधी अनुदान निराधार योजनेची बैठक होणार आहे. धारुर तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज दाखल करावेत.अर्ज मंजुरीसाठी जर कुठल्याही संबंधित अधिकारी यांनी पैशांची मागणी करत असेल तर त्या व्यक्तीचे नाव समितीकडे द्या.असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नवनियुक्त सदस्य व सुरनरवाडीचे सरपंच शिवाजी काळे यांनी केले आहे. निराधारांची कामे करतांना गोरगरिबांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे काळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. 

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पञकात संजय गांधी अनुदान निराधार योजनेचे सदस्य तथा सुरनरवाडीचे सरपंच शिवाजी काळे यांनी म्हटले आहे की,आ.प्रकाश दादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती जाहिर करण्यात आली आहे. 

आ.सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली  या नवनियुक्त समितीची पहिली बैठक दि.१५ते२० फेब्रुवारी दरम्यान धारूर तहसील कार्यालयात होणार असुन, या बैठकीत संजय गांधी,श्रावणबाळ, वृद्ध, अपंग, विधवा आदि विविध योजनेच्या प्रलंबित अर्ज,नवीन लाभार्थ्यांचे ऑनलाईन  अर्ज मंजुर करणे, यासह इतर विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी जे पाञ लाभधारक असतील त्यांनी कागदपञांची पुर्तता करून आपले ऑनलाईन  अर्ज भरून, त्याची एक प्रत कार्यालयात सादर करावी. तसेच हे अर्ज मंजुरीसाठी कुणालाही पैसे देण्याची अवश्यकता नसुन, यासाठी जर कुणी पैशांची मागणी करत असेल तर त्या व्यक्तीचे नाव तहसीलदार व संजय गांधी निराधार योजनेच्या पदाधिकारी यांच्याकडे द्यावेत. असे आवाहन शिवाजी काळे यांनी केले आहे.

No comments