Breaking News

संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी शिवश्री प्रभाकर सटाले तर संघटक पदी शिवश्री विनोद सरवदे यांची निवड

परळी वैजनाथ : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड ची घोडदौड चालू असून त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा पूर्व अध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचं आक्रमक नेतृत्व परळी वै. तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या नेतृत्वा खाली संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका सचिव पदी राष्ट्रवादीचे तडोळी ग्रामपंचायत सदस्य  शिवश्री प्रभाकर उद्धवराव सटाले यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये मंगळवार 02 फेब्रुवारी रोजी परळी येथे झालेल्या संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रवेश केला व त्याच कार्यक्रमात त्यांची संभाजी ब्रिगेड परळी तालुका सचिव पदी निवड करण्यात आली.

 तसेच तालुका संघटक पदी करेवाडीचे शिवश्री विनोद सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. दोघांच्या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव, तालुका कार्याध्यक्ष प्रदुम्न सोनवणे तालुका कार्याध्यक्ष राम किर्दंत, तालुका उपाध्यक्ष नंदू आबा शिंदे, तालुका उपाध्यक्ष दशरथ दादा इंगळे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण दादा गव्हाणे, तालुका संघटक हनुमंत दिवटे, तालुका संघटक हनुमंत जाधव, तालुका सहसचिव पुंडलिक लोणकर, शिवश्री अरुण सपाटे, शिवश्री पवन माने यांच्यासह तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी तील सर्व पदाधिकारी व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.


No comments