Breaking News

चिंचाळ्याच्या पांडुरंग पोकळेंची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

आष्टी :  तालुक्यातील चिंचाळा येथील पांडुरंग शत्रुघ्न पोकळे हे 2017 मध्ये एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोकळे यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. चिंचाळा येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आष्टीतील गणेश विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी घेतल्यानंतर त्यांची राज्य राखीव पोलिस बलात पोलिस कॅन्स्टेबलपदी निवड झाली. एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत ते नुकतेच उत्तीर्ण झाले असून गावातील पहिले पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


No comments