आदर्श पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
गौतम बचुटे । केज
केज येथे आदर्श पत्रकार समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
केज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पत्रकार विजयराज आरकडे, शिवदास मुंडे, धनंजय देशमुख यांच्यासह आदर्श पत्रकार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक सोनवणे, सचिव गौतम बचुटे, कार्याध्यक्ष सौ रत्नमालाताई मुंडे, उपाध्यक्ष महादेव काळे व बाळासाहेब जाधव, संघटक धनंजय घोळवे, कोषाध्यक्ष प्रवीण देशमुख, सहकोषाध्यक्ष जय जोगदंड, यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील कार्यभार सोपवण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष, विजय आरकडे,जेष्ठ पत्रकार धनंजय देशमुख, शिवदास मुंडे व नवनिर्वाचित पदाधिकारी सचिव गौतम बचुटे, कार्याध्यक्ष रत्नमालाताई मुंडे, संघटक धनंजय घोळवे, उपाध्यक्ष महादेव काळे, कोषाध्यक्ष पि.एम. देशमुख,जय जोगदंड व शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार उपस्थित होते
No comments