Breaking News

प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत युवा उद्योजक संघ आयोजित चिकन फेस्टिव्हल उत्साहात


चिकन बिर्याणीचा आस्वाद घेत चिकन काळजीपूर्वक शिजवल्यास बर्ड फ्लू होत नसल्याची प्रशासनाकडून ग्वाही ! 

बीड :  युवा उद्योजक संघाकडून गेल्या काही दिवसांपासून चिकन फेस्टिव्हलद्वारे बर्ड फ्लूच्या अफवेमुळे संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना आधार देण्याचे काम सुरु आहे. संघाचे अध्यक्ष दत्ता जाधव व सचिव धनंजय गुंदेकर यांनी या फेस्टिव्हल आयोजनातून पोल्ट्री व्यवसायातील उद्योजक व या व्यवसायावर आधारित व्यावसायिकांची अडचण ओळखून जनजागृतीचे अभियान हाती घेतले आहे. या चिकन फेस्टिव्हलचे आयोजन धर्मराज फाळके यांच्या धनलक्ष्मी पोल्ट्री व गोट फार्म येथे करण्यात आले होते.

यावेळी जिल्हापशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार,सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सचिन मडावी,  उपायुक्त डॉ.सुरेवाड,तालुका आरोग्य अधिकारी कदम आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दिलीप अण्णा गोरे, एमआयएमचे निझाम भाइ शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, ज्ञानेश्वर राऊत आदींसह पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, पोल्ट्री चालक - मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   


बर्डफ्ल्यू अफवामुळे बीड जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यावसायिक आर्थिक अडचणीत आलेले आहेत.वास्तविक चिकन व अंडी शिजून खाल्याने बर्डफ्ल्यू आजार होत नाही.कुक्कुटपालन व्यवसायिकास धीर व आधार देण्यासाठी बीड जिल्ह्यात युवा उद्योजक संघाकडून "चिकन फेस्टिवल" अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात बोडखा,ता.धारूर येथून सुरू झाली होती.यावेळी बीड शहराजवळ धनलक्ष्मी पोल्ट्री फार्मवर चिकन बिर्याणी तयार करून,अधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीत बिर्याणी खाऊन बर्डफ्ल्यू बाबत अफवा रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी या फेस्टिव्हलमध्ये जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले कि, अशा उपक्रमांमुळे पसरलेल्या अफवांना थांबवता येईल व पोल्ट्रीचालक व्यावसायिकांना होणारा तोटा थांबवता येईल. चांगल्या प्रकारे चिकन शिजवल्यानंतर बर्ड फ्लू व इतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव राहत नाही. बीड जिल्ह्यात काही एकदोन ठिकाण सोडता इतर ठिकाणी अद्याप बर्ड फ्लू आढळून आलेला नाही. त्यामुळे निसंकोचपणे चिकन खायला हरकत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी प्रथिनयुक्त आहार असणारे चिकन हे लोकांनी निःसंशय खावे, काळजी घेऊन चांगल्याप्रकारे खाल्ल्यास बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव राहत नसून शासकीय स्तरावर चिकन खा असे आम्ही सांगतो असे देखील यावेळी ते प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले.

  यावेळी वरील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रमुख पाहुणे आलेले माजी नगराध्यक्ष दिलीप अण्णा गोरे यांनी पोल्ट्रीचालक व्यावसायिकांना आधार देणे आवश्यक असून युवा उद्योजक संघाने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी एमआयएमचे निझाम शेख, आम आदमी पार्टीचे अशोक येडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष दत्ता जाधव यांनी संघाची भूमिका सांगितली तर सचिव धनंजय गुंदेकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मराज फाळके, विकास चौधरी, दीपक धर्मे,विष्णू दाभाडे,योगेश लाखे, विकि देतवाल, दीपक आमटे, लक्ष्मण गायकवाड,अमोल काळे आदिसह युवा उद्योजक संघाचे सदस्य, पोल्ट्री चालक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments