Breaking News

पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू : बनसारोळा येथील हृदयद्रावक घटना

 


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील बनसारोळा येथे मंगळवारी रात्री पिकाला पाणी देण्यसाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, बनसारोळा ता. केज येथील भीमराव दशरथ गोरे हे दि.९ फेब्रुवारी मंगळवारी रोजी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी सर्व्हे नं ६/१ मध्ये असलेल्या शेतातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटार चालू करताना त्यांना विजेचा शॉक बसला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी सकाळी उघड झाल्यानंतर युसूफवडगाव पोलीस स्टेशनचे सपोनि आनंद झोटे, विजय आटोळे यांनी घटनास्थळी दिली. तर बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग वाल्हे हे करित आहेत.

No comments