Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांनी त्या दलित समाजातील शेतकऱ्याच्या उपोषणाची दखल गांभीर्याने घ्यावी - पप्पू कागदे

पप्पू कागदे यांनी उपोषणस्थळी जाऊन त्या दलित समाजातील शेतकऱ्याची भेट घेवून आस्थेवाईकपणे केली चौकशी

उपजिल्हाधिकारी भूसुधार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बसलेल्या शेतकऱ्याच्या उपोषणाला दिला रिपाइंचा पाठींबा 

बीड :  भुसुधारचे उप जिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील दलित समाजातील शेतकरी दगडू निकाळजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला बसले आहेत. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी उपोषणस्थळी जावून अन्यायग्रस्त शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी त्या शेतकऱ्याने त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली असता त्यांच्या उपोषणाला रिपाइंचा जाहीर पाठींबा देत जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्याच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्यावी प्रश्न सोडवावा असे कागदे म्हणाले.

बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील सर्वे नंबर १६९ व १७० मधील शेत जमिनीवर दलित समाजातील दगडू निकाळजे व इतरांचे कुळ कायद्यानुसार मालकी हक्क आहे. हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० च्या  कलम ९२ मधील कायद्यात तरतूद नसतानाही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांनी कुळन्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजीच्या आदेशास अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या अपिलात एक वर्षापूर्वी म्हणजे ३ जानेवारी २०१९ रोजी स्थगिती आदेश दिला.हा आदेश रद्द करण्यात यावा.

 तसेच कुळ न्यायाधीश तथा तहसीलदार यांच्या आदेशानुसार मालकी हक्काची रक्कम भरणा केलेली असल्याने बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील सर्वे नंबर १६९ व १७० च्या ७/१२ वर मालकी हक्कात नोंद घेण्यात यावी. उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकाश आघाव पाटील यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेले अपील गुणवत्तेवर निकाली काढण्यात यावे. या मागणीसाठी  अन्याग्रस्त शेतकरी दगडू निकाळजे व त्यांचा मुलगा लालासाहेब निकाळजे हे बाप लेक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. याची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी उपोषणस्थळी जावून शेतकरी निकाळजे यांची भेट घेतली. यावेळी त्या शेतकऱ्याने उप जिल्हाधिकारी भुसुधार यांच्या मनमानी कारभाराची हकीकत सांगत आपल्यावर कशा प्रकारे प्रशासनिक झालेल्या अन्यायाची व्यथा त्यांच्या समोर मांडली. उप जिल्हाधिकारी यांच्या मनमानी कारभाराची जिल्हाधिकारी जगताप यांनी चौकशी करून दलित समाजातील शेतकऱ्याची उपोषणाची गांभीर्याने दखल घेवून शेतकऱ्यावर झालेला प्रशासनिक अन्याय दूर करावा. तसेच उपजिल्हाधिकारी भुसुधार यांनी दिलेला स्थगिती आदेश रद्द करून कुळ कायद्यानुसार त्या शेतकऱ्याच्या नावे ७/ १२ नावावर करण्याचे आदेश तत्काळ द्यावेत, असे पप्पू कागदे यांनी म्हटले. यावेळी रिपाइंचे राजू जोगदंड, धम्मानंद पारवे, यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते.

.…अन्यथा रिपाइं करणार तीव्र आंदोलन..!

जमिनीच्या वादावरून दलित समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना आजवर मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत, घडतायत. प्रशासनातील अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दलित समाजावर आशा प्रकारे अन्याय करून त्यांच्या हक्कावर गदा आणून वंचित ठेवण्याचा षड्यंत्र केले जात असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कदापिही सहन करणार नाही. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी उपजिल्हाधिकारी भुसुधार यांची स्वतः चौकशी करून शेतकरी दगडू निकाळजे यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइं युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला.

No comments