Breaking News

दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन मुंडे जिल्ह्यात द्वितीय

परळी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्य बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणीत परळी वैजनाथ येथील दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मूंडे हा द्वितीय क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे ‌.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी  बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी आहेरचिंचोली येथे घेण्यात आली.

या निवड चाचणीत 74 किलो वजन गटात तिसऱ्या फेरी अंतीम कुस्ती मध्ये परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेचा पैलवान नितीन व्यंकटराव मुंडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या त्याच्या  यशाबद्दल परळी येथील दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री देविदास राव कावरे सर,मार्गदर्शक सुभाष नाणेकर सर,शिव शंकर कराड,प्रशिक्षक प्रा.अतुल दुबे सर प्रा.डॉ जगदीश कावरे सर यांच्या सह परळी तालुक्यातील कुस्ती प्रेमिनी अभिनंदन केले आहे.

No comments