Breaking News

शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी अमित काळे तर उपाध्यक्ष प्रणित काळे

परळी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. या निमित्त जलालपुर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन सुरु असून जिजाऊ मित्र मंडळ जलालपुर आयोजीत येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती अध्यक्षपदी अमित शिवाजीराव काळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीसाठी जेष्ठांनी सहभाग नोंदविला होता. सर्वानुमते अमित काळे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड केली. मागील वर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त जिजाऊ मित्र मंडळ आयोजीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अमित काळे, उपाध्यक्षपदी प्रणित काळे, सचिव महेश (पप्पु) काळे, कोषाध्यक्ष महेश साबळे  यांची निवड करण्यात आली आहे.

तर सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या मार्गदर्शकपदी राधाकृष्ण साबळे, आत्माराम काळे, शिवाजीराव काळे, बाबुराव सपाटे, पांडुरंग नानाभाऊ काळे, पांडुरंग विठ्ठलराव काळे, श्रीकृष्ण सपाटे, रामेश्वर काळे, चंद्रहास साबळे, प्रल्हाद साबळे, ज्ञानोबा साबळे, विठ्ठल साबळे, राजेभाऊ काळे, मुंजाभाऊ काळे, रामदास काळे, राजेश साबळे, नितीन काळे, किशोर काळे यांची निवड करण्यात आली आहे. आयोजीत केलेल्या बैठकीस विकास काळे, गणेश काळे, अमोल काळे, अरूण सपाटे, डिगांबर काळे, सुनिल काळे, गोविंद काळे, संदीप काळे, भरत काळे, भागवत भोसले, मुंजाभाऊ काळे, वैभव काळे, पप्पु काळे, अरूण सपाटे, भागवत साबळे, भगवान काळे, राहुल साबळे, सिध्देश्वर साबळे, अर्जुन साबळे, महादेव साबळे, छत्रगुण साबळे, साबळे मुक्तेश्वर, बाळू काळे, आयुष काळे, सिद्धेश्वर जाधव, नारायण सपाटे, परमेश्वर साबळे, अर्जुन साबळे, विष्णू काळे, सोमेश्वर साबळे, गोपाळ काळे, दिपक सपाटे, दत्ता रोडे, दत्ता सपाटे, संतोष सपाटे, नाना कोपरे, संतोष साबळे, चेतन साबळे उपस्थित होते.


No comments