Breaking News

रिक्षा चालक-मालकांच्या सर्व समस्या सोडविणार राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष किशोर पिंगळे यांचे प्रतिपादन

बीड :  शहरात विविध ठिकाणी रिक्षा चालकांना विविध समस्यांना समोर जावे लागते. अनेकांचे पोट त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे रिक्षा चालक व मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा नगर सेवक किशोर पिंगळे यांनी गुरुवारी केले.
बीड शहरातील अंबिका चौक येथे राजमुद्रा सामाजिक संघटना संलग्नित ऑटो पाँईटच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजमुद्रा वाहतूक शाखेचे मराठवाडा प्रमुख महेश शिंदे, राजमुद्रा वाहतूक रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष सुशांत लोखंडे, शिव मल्हार संघटनेचे अध्यक्ष संदीप बुधनर, शेख रईस, आकाश पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अध्यक्ष किशोर पिंगळे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सद्यस्थितीला वाहतूक संबंधी रिक्षा युनियन, टॅक्सी युनियन, माल वाहतुक युनियन यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच वाहन चालकांसमोर विविध समस्या असतात. 
अनेकांच्या समस्या निकाली निघत नसल्यामुळे आपला व्यवसायही बंद करावा लागतो. मात्र या पुढे कोणत्याही ऑटो किंवा इतर वाहन चालकावर उपासमारीची वेळ येणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पुढील काळात राजमुद्रा वाहतुक संघटनेच्यावतीने चालकांचे लायसन व पार्किंग समस्या प्रश्न निकाली काढण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यावेळी दत्ता राऊत, गणेश टाटोर, अमेर शेख, साजेद शेख, शेख युसूफ , संतोष उगले, आसाराम शेंडगे, पप्पु तागड,  बंडु घोगे, गोपाळ, सुदाम शिंदे, बाबु, पिंटु तागड, भुजंग तागड, सुभाष दराडे, सुनिल इंगोले, भाऊसाहेब जानोळे, हनुमंत सालगुडे, संतोष लव्हाळे, प्रवीन घुमरे, दिनेश जाधव, शेख इरफान, विशाल आदमुने, रामेश्वर धुताडमल, गंगा रोकडे, भिमराव काटकर, कैलास लाळगे, सोनू डुकरे यांच्यासह इतर उपस्थित होते.
चालकांना विमा काढून देणार
वाहन चालकाचा अपघात झाला तर त्याला हॉस्पिटलचा खर्च पेलावत नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीन जिल्ह्यातील अधिकाधिक वाहन चालकांना अपघात विमा व बॅच काढून दिला जाणार असल्याचे  राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा नगर सेवक किशोर पिंगळे यांनी सांगितले आहे.  
No comments