Breaking News

कडा ही माझी कर्मभूमी विकास कामात नेहमीच झुकते माप देणार : आ. बाळासाहेब आजबे

के. के. निकाळजे । आष्टी

आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कडा शहर व कडा गटातून झालेली आहे कडा शहर हे नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले  आहे म्हणूनच आज मी राजकारणात इथपर्यंत यश मिळवू शकलो आहे. त्यामुळे कडा शहर व कडा गटातील विकासकामांना आपण नेहमीच झुकते माप देऊ असे आश्वासन आमदार बाळासाहेब आजबे यांनी कडा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ  प्रसंगी बोलतांना कडा ग्रामस्थांना दिले.

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते आष्टी तालुक्यातील कडा गटातील 1 कोटी 15 लक्ष रुपये च्या विकासकामांचा शुभारंभ गुरुवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, माजी जि प अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, सुनील नाथ, हरिभाऊ दहातोंडे ,संदीप सुम्बरे, भाऊसाहेब घुले, अशोक पोकळे, महेश आजबे श्रीरंग आप्पा कर्डिले, संग्राम आजबे ,जगन्नाथ ढोबळे, डॉ. सुनील गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना आ. बाळासाहेबआजबे म्हणाले की विकास कामासाठी मी कटिबद्ध असून आज पर्यंत एक वर्ष काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदार संघातील प्रत्येक गावात फुल ना फुलाची पाकळी म्हणून विकास निधी मी दिला आहे यापुढेही कुठलाही भेदभाव न करता विकास कामे आपण करत राहणार असून सर्वांचे सहकार्य त्यासाठी आवश्यक आहे. कडा शहरामध्ये आज विविध विकास कामांना 51 लक्ष रुपये आपण मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील एक वर्ष निधीअभावी विकास कामे करता आली नाहीत परंतु या पुढे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात येतील, त्यामुळे मतदार संघाचा विकास होणार असल्याचे आमदार आजबे यांनी यावेळी सांगितले.

 गुरुवार दिनांक11 फेब्रुवारी रोजी कडा गटामध्ये आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते नांदा येथे जिल्हा परिषद शाळेसमोर ब्लॉक बसवणे (किंमत 4 लक्ष रुपये),फत्ते वडगाव येथे मारुती मंदिर सभामंडप( 5 लक्ष रूपये) निमगाव चोभा येथे राम मंदिर समोर ब्लॉक बसवणे( 5 लक्ष रूपये), निमगाव चोभा येथे निमगाव ते केंद्रे रस्ता (4 लक्ष रुपये) शिरी खुर्द येथे लक्ष्मी माता मंदिर समोर ब्लॉक बसवणे 4 लक्ष रुपये ,महेश मंदिर कडा सभागृह (10 लक्ष रुपये), दलित्वस्ती सिमेंट रस्ता कडा 5 लक्ष, सुतार नेट ते जिल्हा परिषद शाळा ब्लॉग बसवणे 5 लक्ष, गावडे वस्ती ते होळकर वस्ती मजबुतीकरण 14 लक्ष, पासोडी देवी मंदिरासमोर प्रेम ब्लॉक बसवणे 4 लक्ष रुपये, छत्रपती चौक ते दत्त गल्ली पेविंग ब्लॉक बसवणे 4 लक्ष रुपये ,पत्राची शाळा ते झोपडपट्टी रस्ता मजबुतीकरण करणे 4 लक्ष रुपये, मज्जित आवारात पेविंग ब्लॉक बसवणे 4 लक्ष रुपये, तळे वस्ती येथील पथदिवे बसवणे 4 लक्ष रुपये, निमगाव चोभा येथे दलित वस्ती मध्ये सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष रुपये, नांदा येथे सिमेंट नाला बंधारा करणे 25 लक्ष रुपये, फत्तेवडगाव येथे भैरवनाथ मंदिर समोर पेविंग ब्लॉक 3 लक्ष रुपये ,निमगाव येथे झोपडपट्टी जि प शाळा खोली बांधकाम 8 लक्ष रुपये, असे एकूण 71 लक्ष रुपये विकास कामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच रामदास उदमले, सतीश सोले, राजू जरांगे, बबन काळे, अतुल शिंदे ,राहुल जेवे, शरद औटे, सचिन गाडे ,गणेश सरोदे ,कैलास आजबे ,बाळासाहेब कर्डिले ,राम कर्डिले, बाबा कर्डीले ,बाळासाहेब इंगोले ,सोमा कर्डिले ,कर्डिले गणेश घावटे ,अनिल माळी ,मारुती औटे, संजय औटे, बबन आवटे बबनराव पवार विजय शेळके बंटी गायकवाड संजय कर्डिले विनोद पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments