प्रिती लातूरकर यांना "शक्ती" पुरस्कार जाहीर
लातूर : पनवेल येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील कामगार सेनेच्या राजे प्रतिष्ठान च्या वतीने शिवशक्ती सन्मान सोहळ्यानिमित्त तृतीय पंथीनी समाजासाठी केलेल्या कामानिमित्त लातूर येथील प्रिती लातूरकर यांना नुकताच शक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर, सरचिटणीस केवल महाडिक यांनी दिली. याबाबत पत्रकात खानविलकर आणि महाडिक यांनी सांगितले की,लातूर शहरातील तृतीय पंथी प्रिती लातूरकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे.
२६ फेब्रवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विकी शिंदे, नंदिनी कांबळे, शिवलक्ष्मी नंदा गिरी, रूपा जोगी, राणी ढवळे, अंजली पाटील, अमृता भोसले, अंकिता साठी यांना देखील विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याविषयी प्रीती लातूरकर म्हणाल्या की,तृतीय पंथात काम करत असलेल्या जवळपास नऊ तृतीय पंथीयांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. सन्मानचिन्ह व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रिती लातूरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments