Breaking News

मोगरा येथील शिवाजी नगर मध्ये गँसचा स्फोट होऊन घराला लागली आग

कोणतीही जिवीतहानी नाही, मात्र लाखो रुपायांचे आर्थिक नुकसान

माजलगाव : तालुक्यातील मोगरा गावातील शिवाजी नगर येथील रहिवासी ऊसतोड कामगार प्रकाश पवार,आशोक पवार व विकास पवार यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली.  

ज्यामुळे घरातील सर्व सामग्री नष्ट झाली.ही आग इतकी भयंकर होती की प्रकाश पवार यांचे शेजारी अशोक पवार यांच्याही घरालाही आग लागली.  अग्निशमन दलाच्या आगमनापूर्वीच संपूर्ण वस्तूची नुकसान झाली.  घरात कुणीही नसल्याने  कुटुंबात जिवीतहानी झाली नाही मात्र घरातील रोकड व दागिन्यांच्या विविध वस्तू जळाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली आहे,प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असुन त्यांनी पंचनामा केला आहे.

No comments