Breaking News

परळी थर्मलच्या राखेचे दुष्परीनाम भोगतोय शेतकरी..!

कोळसा व पांढर्या राखेमुळे आमची पिके नष्ट झाली- हरिष नागरगोजे

परळी वैजनाथ : परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणार्या राखेचे अनेक दुष्परीनाम समोर येत असुन नागरीकांच्या आरोग्यावरील दुष्परीनामानंतर थर्मलची राख शेतकर्यांच्या मुळावर उठली आहे.नविन थर्मलमधुन बाहेर पडत असलेल्या पांढर्या व कोळशाच्या   राखेमुळे आमचे पिक उध्वस्त झाले असुन याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा दि.12 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी हरिष नागरगोजे यांनी दिला आहे.


परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणार्या राखेचे अनेक दुष्परीनाम जाणवत आहेत.नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणारी ही राख शेतकर्यांच्या मुळावर उठली आहे नविन परळी औष्णीक वीजनिर्मिती केंद्राच्या पश्चीमेस असलेल्या शेतकर्यांना थर्मलमधुन बाहेर पडणार्या रागेबरोरच कोळशाच्या काळ्या राखेचा जीवघेणा सामना करावा लागत आहे.

वीज निर्मिती साठी येणारी राख ज्या ठिकाणी खाली करण्यात येते त्या ठिकाणाहुन काळ्या राखेचे अक्षरशः धुराचे लोट निघत आहेत.या राखेमुळे आजुबाजुच्या शेतकर्यांचे पिक पुर्णपणे नष्ट झाले आहे.आमच्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच कोळसा हाताळणी विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्या कारभाराची चौकशी चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा दि.12 फेब्रुवारी रोजी संबंधीत शेतकर्यांसह औष्णीक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर आमची राखेमुळे करपलेली पिके आणुन आंदोलन करणार असल्याचा इशारा संगम येथील शेतकरी तथा युवा कार्यकर्ते हरिष नागरगोजे यांनी दिला आहे.

No comments