Breaking News

आज परळीत महावितरण विरोधात भाजपचे``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन


परळी : महावितरणच्या कारभारात कोणताही ताळमेळ नाही, मंत्री म्हणतात वीज बिल माफ करू, तर उपमुख्यमंत्री सांगतात लाईट बिल भरा, नाहीतर वीज तोडू. या कारभारात ग्राहक भरडला जात असून या संदर्भात भाजप आज आंदोलन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिली.

महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी भाजपाने  महावितरण विरोधात भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथील वीज वितरण कंपनी विरोधात``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन करण्यात येनार आहे.

आजच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व विवीध आघाडीचे चे पदाधिकारी व वीज ग्राहकांनी सकाळी 10:30 वाजता महावितरण कार्यालयासमोर उपस्थित राहवे असे आवाहन शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया  , तालुकाध्यक्ष         सतीश मुंडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

No comments