Breaking News

रस्त्यामुळे ऊस तोड रखडली : रस्ता न दिल्यास शेतकऱ्यांचा शेतातच सामुहिक आत्मदहनाचा इशारा

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ऊस तोड रखडली आहे ऊसतोड रखडलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर उसाच्या फडातच सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केज तालुक्यातील शेतकरी महादेव ईखे, अनंत कणसे, मारुती कणसे, रामेश्वर गुळवे, शिवाजी ईखे, पांडुरंग ईटकर, चांगदेव यादव यांनी तहसीलदार केज यांना निवेदन दिले असून म्हटले आहे की, सोनेसांगवीच्या शिवारातील गट नं सर्व्हे नं १५, २१, २२ आणि २५ मध्ये ऊस लागवड केली आहे या उसाला जवळ जवळ एक वर्षापेक्षा जास्त मुदत झाली असून १३-१४ महिने लोटले आहेत मात्र शेजारील काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून घ्यावा अन्यथा चार दिवसात जर रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर शेतातील उसाच्या फडात सामुदायिक आत्मदहन करण्याचा ईशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. यावर आता प्रशासन काय निर्णय घेते आणि या शेतकऱ्यांनाचा ऊस गाळप होते की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





No comments