Breaking News

केजमध्ये महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

 

गौतम बचुटे । केज  

एका एकोणिसाव्या वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज शहरातील भवानी नगर मध्ये मंगळवारी (दि.९)  केली.

या बाबतची माहिती अशी की, दि. ९ फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी केज येथील धारूर रोड लगतच्या भवानी नगर येथे ल संपत्त चव्हाण यांची मुलगी तेजल संपत चव्हाण वय १९ वर्ष हिने राहत्या घरात छताच्या पंंख्याला साडीने गळफास घेेेऊन आत्महत्त्या केली.  तेेेलजचे आई-वडील हे अहमदनगर येेथे काम करीत होते. ती केेेज येेथे राजूबाई व गणपत चव्हाण या तिच्या आजी-आजोबांकडे रहात होती. तसेच तिचे चुलते हे परळी येथे कंत्राटी पद्धतीने पोस्टात काम करीत असल्याने तिने घरी कोणी नसताना चुलते विठ्ठल चव्हाण यांच्या घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

तेजल ही अंबाजोगाई येथील मराठवाडा महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे माजलगाव तालुक्यातील वानटाकळी येथील नात्यातील तरुणाशी लग्न ठरले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि वैभव राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीचे आजोबा गणपत चव्हाण यांनी दिलेल्या माहिती नुसार केज पोलीस स्टेशनला सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर व मंगेश भोले हे करीत आहेत. अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

No comments