Breaking News

दयानंद व्यायाम शाळेच्या पैलवानांना केले वाल्मीक आण्णा यांनी सन्मानित


परळी :
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणी आहेरचिंचोली येथे घेण्यात आली होती. या मध्ये परळी वैजनाथ येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळेचे पैलवान नितीन व्यंकटराव मुंडे 74 किलो वजन गटात , मयूर ध्वज राजाभाऊ कणसे 86 किलो वजन गटयाचा माती विभागातील स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक व सिंहध्वज सुभाष कणसे 86 किलो वजन गट गादी विभाग दोन्ही गटातून द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळवल्या बद्दल कुस्ती तृतीय क्रमांक राजाभाऊ मुंडे सहभाग नोंदवल्या

 बद्दल परळी येथील नगरपरिषदेचे गटनेते  वाल्मीक अण्णा कराड यांच्या हस्ते व्यायाम शाळेच्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला यावेळी दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री देविदास रावजी कावरे सर नाणेकर सर  शिव शंकर कराड,प्रा.डॉ.पी.एल.कराड प्रा.डॉ.जगदिश कावरे सर,प्रा.अतूल दुबे सर,सुरेंद्र भैय्या कावरे शरद  कावरे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी सन्माननीय वाल्मीक अण्णा कराड तसेच परळी नगरपरिषदेचे नगरसेवक श्री.शरद भाऊ मुंडे यांनी दोन्ही पैलवानांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील स्पर्धेकरिता सर्वतोपरी मदत करणार असेही या सत्काराच्या वेळी परळी नगर परिषदेचे गटनेते आदरणीय वाल्मीक आन्ना कराड यांनी बोलताना सांगितले.

No comments