Breaking News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जनजागृती अभियान

गौतम बचुटे । केज 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दिल्लीत मागील दोन महिन्यां पासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आंदोलन दडपण्याचे मोदी सरकारकडून वारंवार अनेक प्रयत्न होत आहेत. सदर कायदा हा शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालणारा काळा कायदा आहे. या बाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यात जनजागृती करून त्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी, हमी भाव, एम एस पी याची माहिती व्हावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांच्या आदेशा नुसार जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर, अशोक गित्ते, भागवत पवार, सय्यद जमिल पटेल, दत्ता गुंड हे प्रत्येक गावागावात जाऊन क्वॉर्नर बैठका घेत आहेत. साळेगाव येथून याची सुरुवात केली असून या वेळी माजी सरपंच सुभाष गालफाडे, नारायण लांडगे, संतोष क्षिरसागर, गोविंद इंगळे,  ज्योतिराम बचुटे आणि शेतकरी उपस्थित होते.


No comments