Breaking News

कड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार अत्याधुनिक यंत्राव्दारे रुग्णांची तपासणी


कडा :  आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्डीयाक माॅनिटर उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना याचा फायदा होणार असून येथे विनामुल्य तपासणी होणार असून यासाठी येथे स्वतंत्र कक्षाची उभारणीही करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल आरबे यांनी दिली. आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपडे पालटण्याचे कार्य तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन मोरे व डॉ अनिल अरबे यांनी केले. या जोडीने आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन येथे वेगवेगळे उपक्रम राबविले आहे.

 

त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून  येथे कार्डीयाक माॅनिटरसह नेबुलायझर, फिटल डाॅप्लर, आॅक्सीजन सिलेंडर, इसीजी मशीन, वाफ देण्याचे यंत्र या सारखी आधुनिक यंत्र प्रणाली उपलब्ध झाल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची विनामुल्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या वेळेची अन् पैशाची ही बचत होणार आहे. तसेच येथील प्रयोग शाळेत पल्स, एसपीओटू, रक्तदाब, शरीरातील साखर तसेच सीबीसी, थॉयराईड,किडणी, लिव्हर, रक्तातील चरबी, कॅल्सीयम, सोडियम, युरिक अॅसिड, रक्त, लगवी, शरीरातील साखर इत्यादी  तपासण्या विनामुल्य होणार असल्याने रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल अरबे यांनी केले आहे.

No comments