Breaking News

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची संभाजी नगर पोलीस ठाण्यास भेट

परळी वैजनाथ : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी शहरातील संभाजी नगर पोलीस ठाण्यास मंगळवारी (ता.०२) भेट देवून तपासणी केली.


औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. यावेळी संभाजी नगर पोलीस ठाण्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान सर्व अद्यावत रेकाँर्ड पाहून समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी पोलीसांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना नैतिकता जोपासली पाहिजे. तसेच वेळेवर कर्तव्य बजावले पाहिजे, पोलीसांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने हाताळून कायदा व सुव्यवस्था जोपासने गरजेचे असल्याचे सांगितले. या दौऱ्यात पोलीस अधिक्षक आर राजा, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय,संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंडके यांच्यासह दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

No comments