Breaking News

घरात घुसून आई व मुलीस मारहाण करून दागिने हिसकावून केला विनयभंग : चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज  

जुन्या कौटुंबिक भांडणातून केज येथे घरात घुसून मायलेकींना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन पुरुष व दोन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची अशी की, केज व कळंब येथील दोन कुटुंबाचे कौटुंबिक भांडण कळंब न्यायालयात न्याप्रविष्ठ आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारी ४:३० च्या दरम्यान कळंब येथील दोन पुरुष व दोन स्त्रिया यांनी केज मधील फुले नगर येथील घरात पुरूष मंडळी उपस्थित नसताना ओळखीचा गैफायदा घेऊन प्रवेश केला. त्यांच्याशी चौघांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले व वाईट हेतूने शरीराशी व अंगावरील वस्त्राशी झोंबझोंबी करून विनयभंग केला. तसेच तिचा पती नंतर घरी आला असता त्याला पण दगडाने मारहाण केली.

या प्रकरणी महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला दोन पुरुष व दोन महिला त्यांच्या विरुद्ध विनयभंग, बेकायसीरपणे घरात घुसून दागिने हिसकविणे, मारहाण व शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देणे या वरून गु. र. नं. ५१/२०२१ भा. दं. वि. ३५४, ४५२, ३२७, ४२७, ३२३, ५०४ व ५०६ प्रणारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

No comments