Breaking News

रेवकी गटातील गावात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून शिवजयंती होणार साजरी

बी.एम.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांची माहिती ; उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गजराज सौंदलकर

गेवराई : गेवराई तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गावात यावर्षी बी.एम.प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य-दिव्य अशी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. गावा-गावात श्रमदानातून स्वच्छता अभियान यासह अन्य स्तुत्य उपक्रम या शिवजयंती उत्सवादरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी दिली. दरम्यान या उत्सवा समितीच्या अध्यक्षपदी गजराज सौंदलकर, उपाध्यक्ष अंगद खाडे, अभिषेक येवले, बाळासाहेब पराड तर सचिवपदी कृष्णा पंडीत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या उत्सवादरम्यान श्रमदानातून स्वच्छता अभियानासह सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.

    बी.एम.प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मस्के हे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून नव-नवीन सामाजिक तसेच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवितात. दरम्यान यावर्षी रेवकी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या सर्वच गावात मिळून एक सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निश्चय बाळासाहेब मस्के यांनी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सहमती दर्शविण्यात आली. यानंतर या उत्सवाचे नियोजन तसेच कार्यकारिणी निवडण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या अध्यक्षतेखाली व बी.एम.प्रतिष्ठाणचे गेवराई तालुका अध्यक्ष विकी दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान या अभिनव उपक्रमावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

    तसेच गावाच्या विकासाच्या हेतूने घेण्यात येणाऱ्या या शिवजयंती उत्सव नियोजन समितीच्या अध्यक्षपदी गजराज सौंदलकर, उपाध्यक्ष अंगद खाडे, अभिषेक येवले, बाळासाहेब पराड, कार्याध्यक्ष बप्पा टकले, सहकार्याध्यक्ष राहुल काळे, सचिव कृष्णा पंडित, सहसचिव फारुक शेख, कोषाध्यक्ष ज्ञानदेव गंडगे, सहकोषाध्यक्ष धोंडीराम कदम यांची निवड करण्यात आली. तसेच शिवजयंती उत्सव गाव प्रमुख म्हणून गोंदी येथे हरिभाऊ मस्के, सावळेश्वर येथे राजे केरळकर, नागझरी येथे संभाजी घमाट, खामगाव येथे नितीन वारे, बागपिंपळगाव येथे विष्णुपंत गायकवाड, हिंगणगाव येथे रुद्रा परदेशी आदींच्या सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे बाळासाहेब मस्के यांनी अभिनंदन केले. या बैठकीला रेवकी-देवकी जिल्हा परिषद सर्कलमधील युवक,तरुण, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली होती.

मुक्कामी राहून गावोगावी स्वच्छता अभियान

  श्रमदानातून स्वच्छता अभियान या उपक्रमाचे गावानुसार नियोजन करण्यात आलेले आहे. रोज तीन गावात स्वच्छता मोहीम राबवून व यानंतर रात्री देखील गावातच मुक्कामी राहून लगेच सकाळी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये दि. 6 फेब्रुवारी मन्यारवाडी, गोविंदवाड़ी, ढोक वडगाव, दि.7 फेब्रुवारी रोजी पांढरवाडी, बागपिंपळगाव, बेलगाव, दि.8 रोजी म्हाळस पिंपळगाव, सावळेश्वर, खामगांव, दि.9 रोजीआगरनांदूर, नागझरी, विठ्ठलनगर, बागपिंपळगाव कँम्प, दि.10 रोजी दैठण, कटचिंचोली, लुखामसला, दि.11 रोजी गोंदी, हिंगणगाव, संगम जळगाव, दि.12 रोजी रेवकी, देवकी, कोल्हेर या गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व बी.एम. प्रतिष्ठान आणि रेवकी सर्कल मधील सर्व शिवभक्तांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.


No comments