केज आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अवैद्य धंद्यावर कार्यवाही : मोठ्यांना अभय तर छोटे कार्यवाहिला बळी
गौतम बचुटे । केज
केज पोलीसांनी शहर आणि परिसरातील अवैद्य धंद्यावर सलग दुसऱ्या दिवशीही धाडी घालण्याचे सत्र सुरूच असून हातभट्टी व मटक्या विरोधात कार्यवाही केल्या आहेत.
दि. २७ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस संतोष मिसळे यांच्या पथकाने सहाय्यक फौजदार महादेव गुजर आणि मंगेश भोले यांनी केज येथील पंचायत समिती कार्यालताच्या पाठीमागे आणि जुन्या सरकारी दवाखान्या जवळ चालवीत असलेल्या मटका बुक्यावर धाड टाकली. यात त्यांनी मटक्याचे साहित्य व नगदी रोख रक्कम जप्त केली.
तसेच दुसऱ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांच्या पथकाने साळेगाव, उत्तरेश्वर पिंप्री आणि चिंचोली माळी येथील हातभट्टीवर धाड टाकली. यात तयार गावठी दारू, दारू तयार करण्याचे रसायन तसेच हनुमंत पिंप्री येथे मटका बुक्कीवर धाड टाकली. यात मुद्देमाल, मटक्याचे साहित्य आणि नगदी रोख रक्कम असे साहित्य जप्त केले. हातभट्टीच्या कार्यवाहीत तयार दारू, तयार करण्याचे रसायन आणि टॅगो पंच कंपनीच्या देशी दारू जप्त करून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. या कार्यवाहीत हेड कॉन्स्टेबल दिनकर पुरी, अशोक नामदास, धनपाल लोखंडे, अशोक गवळी, वाहन चालक हनुमंत गायकवाड हे या कार्यवाहीत सहभागी झाले होते.
छोटे मासे गळाला तर मोठे मोकाट
अवैद्य धंद्यावर पोलीसांची कार्यवाही सुरू असली तरी ही केवळ लुटुपुतूची लढाई असून वरिष्ठांना दाखविण्यासाठी असल्या छोट्या कार्यवाह्या केल्या जात आहेत. मात्र अनेक मोठे धंदे करणारे मोकाट असल्याने 'अजब राजा गजब कार्यवाही' याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
No comments