अपघात टाळण्यासाठी वडवणी काँग्रेसने लावले ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रेडियम रिफ्लेक्टर
ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह बीड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
बीड : ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात काँग्रेस बळकटीकरण सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत वडवणी काँग्रेस तालुक्याच्या वतीने शनिवारी (दि.६) तेलगाव सहकारी साखर कारखाना येथील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रेडियम रिफ्लेक्टर लावून होणारे अपघात टाळण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे, उपाध्यक्ष नागेश मिठे पाटील,अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार, काँग्रेसचे जिल्हा सचिव शिराजभाई, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गोविंद साठे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दत्ता प्रभाळे, वडवणी युवक तालुका अध्यक्ष विजय पवार , दत्तात्रय सौदरमल आदी उपस्थित होते.
No comments