Breaking News

नगराध्यक्षांनी शहराची तर आमदारांनी मतदारसंघाची वाट लावलीय : आ.विनायकराव मेटे

 


क्षीरसागर कुटूंबियांनी भकास केलेल्या बीड शहराला आ.मेटे देतायत आकार..!

आ.विनयाकराव मेटे यांच्या शहर विकास फंडातून पहिल्या टप्प्यात बीड शहरात 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

 बीडच्या भाजी मंडई, नाळवंडी नाका, बार्शी नाका, बालेपीरमधील सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्याच्या कामाचे आ.मेटेंच्या हस्ते भूमीपूजन

बीड : बीड शहरातील विविध भागात विकासाच्या नावावर रस्ते खोदून पाच वर्षांचा कालावधी होत आहे. मात्र विकास कामे करण्यासाठी बीडच्या विकास पुरूषांना मुहूर्त सापडत नाहीये. येथील जनता वर्षानुवर्षे क्षीरसागर कुटूंबियांच्या दळभद्री राजकारणाने बेजार झाली आहेत तर मतदारसंघातील पोरखेळा मुळे ही अशीच वाईट अवस्था निर्माण झाली. एकंदरीत नगराध्यक्षांनी शहराची तर आमदारांनी मतदारसंघाची वाट लावलीय असल्याचे मत आ.विनायकराव मेटे यांनी येथे केले.

आ.विनयाकराव मेटे यांच्या शहर विकास फंडातून पहिल्या टप्प्यात बीड शहरात विविध ठिकाणी 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ रविवारी (दि.१४) करण्यात आला. यावेळी शहरातील भाजी मंडई, नाळवंडी नाका, बार्शी नाका, बालेपीरमधील सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्याच्या कामाचे आ. मेटेंच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. मेटे म्हणाले की, शहरातील विविध भागात अमृत जल योजनेतंर्गत नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आली. त्यानंतर भुयारी गटार योजनेच्या कामासाठी पुन्हा रस्ते खोदण्यात आले. पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना अद्यापही शहरात कार्यान्वित करण्यात आली नाही, ते काम अजुनही रखडलेले आहे.मात्र या विकास कामाला सुमारे तीन साडेतीन वर्षांचा कालावधी लोटत असून हे काम अपूर्ण आहे. एका मागून एक उन्हाळे- पावसाळे जात आहेत. रस्ते चिखलाने माखत वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुशिकल झाले. शिवाय परिसरातील नाल्या तुंबत असल्याने ते घाण पाणी रस्त्यावर येऊन गल्ल्यांगल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आशा हालाकीच्या स्थितीत बीडची जनता असताना काका- पुतणे आपल्या स्वार्थी राजकरणासाठी जनतेला वेठीस धरत आहेत.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे कोणाचा जीव जावो किंवा काहीही होऊ याच्याशी यांना काही देणे घेणे नाही. मात्र आपली सत्ता आणि खुर्ची कशी शाबूत राहील. यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. काका पुतण्याच्या या नौटंकीचा तमाशा बीडकर उघड्या डोळ्याने पाहत आहेत. पाच वर्षांचा कालावधी लोटत आहे, परंतु रस्ते, नाल्या, पाणी या मुलभूत  सुविधा पुरविण्यासाठी तुम्ही टक्केवारीच्या वाटाघाटीसाठी नागरिकांना वेठीस धरता. अरे थु तुमच्या राजकारणावर !  असे म्हणत क्षीरसागर काका- पुतण्यावर आ.मेटे यांनी टीका केली.
क्षीरसागरांच्या गलिच्छ राजकारणामुळे बीडकरांचे होत असलेले हाल पाहवत नसल्याने आणि बीडकरांना मूलभूत सुविधा पुरविण्याचा दिलेला शब्द पाळत माझ्या शहर विकास फंडातून 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे शहरातील पहिल्या टप्प्यात शहरातील भाजी मंडई, नाळवंडी नाका, बार्शी नाका, बालेपीरमधील सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्याच्या कामाचे आज भूमीपूजन करण्यात आले. लवकरच दर्जेदार रस्ते व नाल्याचे कामाला सुरवात होऊन खुले होतील. असे ही आ. मेटे म्हणाले.
No comments