Breaking News

बर्डफ्ल्यू अफवा रोखण्यासाठी "चिकन फेस्टीवल" अभियान


युवा उद्योजक संघाकडून आज या अभिनव उपक्रमाचे आयोजन

बीड :  जिल्ह्यात बर्डफ्ल्यूमुळे नव्हे तर अफवेमुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांवर आर्थिक संकटाची वेळ आलेली असून,चिकन व अंडी शिजून खाल्याने बर्डफ्ल्यूचा धोका होत नाही,यासाठी बीड जिल्ह्यात युवा उद्योजक संघाकडून "चिकन फेस्टिवल" अभिनव अभियान सुरू केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन बीड-वासनवाडी रस्त्यावर धर्मराज फाळके यांच्या धनलक्ष्मी पोल्ट्री व गोट फार्म येथे दि.१२ फेब्रुवारी ,दु.१ वाजता,जिल्हापशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय देशमुख, उपायुक्त डॉ.सुरेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार,सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सचिन मडावी  व पत्रकार,सामाजिक नेते यांच्या उपस्थितीत केले आहे.

         बर्डफ्ल्यू अफवामुळे बीड जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यावसायिक आर्थिक अडचणीत आलेले आहेत.वास्तविक चिकन व अंडी शिजून खाल्याने बर्डफ्ल्यू आजार होत नाही.कुक्कुटपालन व्यवसायिकास धीर व आधार देण्यासाठी बीड जिल्ह्यात युवा उद्योजक संघाकडून "चिकन फेस्टिवल" अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात बोडखा,ता.धारूर येथून सुरू झाली होती.यावेळी बीड शहराजवळ धनलक्ष्मी पोल्ट्री फार्मवर चिकन बिर्याणी तयार करून,अधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीत बिर्याणी खाऊन बर्डफ्ल्यू बाबत अफवा रोखण्यात येणार आहेत.बीड जिल्ह्यात बर्डफ्ल्यू अफवा थांबवण्यात यावी व पोल्ट्री व्यावसायिकांना बळ मिळावे यासाठी हे अभिनव अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती युवा उद्योजक संघ अध्यक्ष दत्ता जाधव,युवा उद्योजक संघ सचिव धनंजय गुंदेकर,धर्मराज फाळके,विकास चौधरी,दीपक धर्मे,अमोल काळे,गोरक्षनाथ तिडके आदींनी केले आहे.

No comments