Breaking News

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

बीड :  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०२ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी सकाळी ११.३० वा. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यलयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 


या बैठकीस ना. मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.  कोव्हिड संसर्गाच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरुवात झाली असुन, आरोग्य विषयक उपाययोजना तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजना आदींचा आराखडा व नियोजन या बैठकीतून होणार असल्यामुळे, उद्या होणाऱ्या या बैठकीकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागून आहे.

No comments