Breaking News

गावातील प्रत्येक बूथ कार्यकर्ता माझा प्रतिनिधी : खा.डॉ. प्रीतम मुंडे

माजलगाव : जेवढे संघटन मजबूत तेवढा पक्ष मजबूत होत असतो माझ्या विजयात बूथ रचनेचा मोठा वाटा असून, आगामी काळात पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी कार्यकर्त्यानी परिश्रम घ्यावेत. प्रत्येक बूथ कार्यकर्ता माझा त्या गावातील प्रतिनिधी असून बूथ सक्षमीकरना सोबत कार्यकर्त्यानी त्यांच्या गावातील प्रश्नांची सोडवणूक करावी,बूथ कार्यकर्त्यांच्या गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्राध्यान्याने कार्यरत राहू असे प्रतिपादन खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी माजलगावात आयोजित बूथ रचनेच्या बैठकीत केले.

२३फेब्रुवारी मंगळवार रोजी शहरात बूथ रचनेच्या अनुषंगाने बूथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोनामुळे बूथ प्रमुखांची बैठक रद्द करून शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.  या प्रसंगी खा.डॉ प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की, माजलगाव हा तालुका मुंडे साहेबांवर व पक्षावर प्रेम करणारा आहे. विधानसभेत जरी भाजपला अपयश पदरात पडले असले, तरी आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणूकां साठी बूथ रचना परिपूर्ण करणे महत्वाचे आहे. या प्रसंगी बीड च्या रेल्वे करिता मंजूर करवून आणलेल्या निधी बाबत त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करून त्यांचा माजलगाव भाजप तर्फे सत्कार करण्यात आला या वेळी डॉ प्रकाश आनंदगावकर, तालुकाध्यक्ष अरुण  राऊत, माजीनगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके, जिल्हा सरचिटणीस डॉ देविदास नागरगोजे, शंकर देशमुख यांच्या सह तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.     

No comments