Breaking News

केजमध्ये पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

वात्रटीकाकार प्रा. सत्यप्रेम लगड यांच्या वात्रटिकांनी वाढली पुरस्कार सोहळ्याची रंगत

गौतम बचुटे । केज 

केज येथे मूकनायक दिन आणि दर्पण दिनाच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या आदर्श पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कार प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार विजय हमीने यांना  पुरस्कार देण्यात आला. या वेळी बोलताना एस. एम. देशमुख म्हणाले की, सामाजिक जाणिव आणि जागृती ठेवून पत्रकार अहोरात्र काम करीत असतात; परंतु संकट समयी माध्यमानाही सांभाळून घेतले पाहिजे. सध्या माध्यमासाठी संकटांचा काळ असून पत्रकारांनी इतर व्यवसायात उतरायला हवे. असे प्रतिपादन त्यांनी केले.


३१ जानेवारी रोजी केज येथे आदर्श पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दिन आणि दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकार पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ पत्रकार विजय हमीने यांना एस. एम. देशमुख यांच्या हस्ते जिवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तम हजारे यांना आदर्श पत्रकार, अभिमन्यू घरत यांना आदर्श संपादक, उदय नागरगोजे यांना आदर्श युवा, उमेश जेथलिया यांना स्व. पत्रकार सुनिल देशमुख स्मृती आदर्श निर्भीड, मनोज गव्हाणे यांना स्व. मोहन भोसले स्मृती आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निष्ठेने कर्तव्य बजावणारे तहसीलदार दुलाजी मेंढके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांना विशेष आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, गटनेते हारूणभाई इनामदार, बालासाहेब बोराडे, प्रसिद्ध वात्रटिकाकार प्रा. सत्यप्रेम लगड, मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष चौरे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले, अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर हे प्रमुख अतिथी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे गौतम खटोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वगताध्यक्ष आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष विजयराज आरकडे हे होते.

या वेळी बोलताना प्रमुख एस. एम. देशमुख यांनी पत्रकार हल्लविरोधी कायदा, पत्रकार पेन्शन या सह सध्या माध्यमावर ओढवलेल्या संकटांची व त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली आणि आता पत्रकारांनी व्यवसाय करावा असे नमूद केले. तर अध्यक्षीय समारोप करताना गौतम खटोड म्हणाले की, पत्रकारांसाठी कार्यशाळा व त्याच्या उन्नतीसाठी आम्ही।प्रतिष्ठांच्या माध्यमातून काम करण्याची त्यांनी तयारी दर्शविली. 

पुरस्कार सोहळ्याला बजरंग सोनवणे, हारुणभाई इनामदार, भाई मोहन गुंड, भगवान केदार, दत्ता धस, रणजितसिंह पाटील, राहुल गदळे, योगिनीताई थोरात, बालासाहेब बोराडे, प्रा. हिरवे सर, संतोष सोनवणे, डी डी बनसोडे, महादेव गायकवाड, अजय भांगे, प्रा. धनराज भालेराव, सिताताई बनसोड, गोपीनाथ इनकर, बाबा मस्के, राहुल खोडसे, महेश जाजू, किसन कदम, मनीषा घुले, अनिता कांबळे, हे उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्तींच्या वतीने जिवनगौरव पुरस्कार प्राप्त विजय हमीने यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे ऋण व्यक्त करीत ते भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयराज आरकडे, सतीष केजकर, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, गौतम बचुटे, अशोक सोनवणे, सुहास चिद्रवार, शुभम खाडे, दशरथ चवरे, धनंजय घोळवे, अमोल जाधव, प्रकाश मुंडे, दत्ता हांडीबाग, गोविंद शिनगारे, अनिल गलांडे, अशोक भोसले, बळीराम भोसले, बाळासाहेब जाधव, दादासाहेब ढाकणे, नंदकुमार मोरे, जय जोगदंड, अक्षय वरपे, अनंत जाधव, इतापे रमेश, चंद्रकांत पाटील, दिपक साखरे, अर्शद शेख, मनोराम पवार, अझिमोद्दीन इनामदार, उत्तरेश्वर शिंदे, प्रविण देशमुख, शेख वाजेद, महादेव काळे, भुजंग इंगोले, बाळासाहेब खोगरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराज आरकडे यांनी तर आभार गौतम बचुटे यांनी व्यक्त केले.

गुलाल बंगल्याव की घरावर उधळणार !  

 वात्रटिकाकार कवि प्रा सत्यप्रेम लगड यांनी सादर केलेली वात्रटिका गुलाल याचा धागा पकडून गटनेते हारूणभाई इनामदार यांनी जोरदार फटकेबाजी केली तर बजरंग सोनवणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिली यामुळे सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

No comments