Breaking News

माजलगाव पंचायत समिती मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी


पत्रकार सुरक्षा समितीच्या पदधिकाऱ्यांचाही सत्कार संपन्न

माजलगाव :   येथील पंचायत समितीच्या सभागृहात शिव छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी पंचायत समितीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून सभापती पती भागवतराव खुळे,पंचायत समिती सदस्य मिलींद लगाडे,चंद्रकांत वानखेडे  यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदधिकाऱ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे अराध्य दैवत कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जंयती पंचायत समिती मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी पंचायत समितीच्या सभापती पती भागवतराव खुळे,पंचायत समिती सदस्य मिलिंद लगाडे, चंद्रकांत वानखेडे यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.याच कार्यक्रमात पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे, सचिव संतोष जेथलीया, संघटक अँड आमर साळवे यांच्या निवडी झाल्याबद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या, यावेळी पत्रकार भगिरथ तोडकरी,कुषीधिकारी सिध्देश्वर हाजारे,विस्तार अधिकारी रंजित घनघाव,कुषी विस्तार अधिकारी चव्हाण,देशमुख, गव्हाणे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.
No comments